दिवाळीच्या दिवशी वरूड बिहाडे च्या शेतकर्याची आत्महत्या.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 22:37 IST2017-10-19T22:36:07+5:302017-10-19T22:37:10+5:30

दिवाळीच्या दिवशी वरूड बिहाडे च्या शेतकर्याची आत्महत्या.
तेल्हारा : तालुक्यातील वरूड बिहाडे येथील शेतकऱ्यांने दि. 19 ऑक्टोबर ला विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. भर दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. वरूड बिहाडे येथील वासुदेव महादेव बिहाडे या 56 वर्षीय शेतकऱ्यांने विस्कटलेली आर्थिक परिस्थिती व असलेले बँकेचे कर्ज या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली . सदर शेतकर्यांवर व त्याच्या पत्नीचे नावे बँके चे कर्ज आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावातील अंबादास ठोसर या युवा शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपविली त्यांच्या अस्तीची आग विझत नाही तोच भर दिवाळीच्या दिवशी वासुदेव बियाणे यांनी आत्महत्या केल्याणे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी , तिन मुले असा मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास तेल्हारा पोलीस करित आहेत.