शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:29 IST2020-06-15T10:29:29+5:302020-06-15T10:29:38+5:30
दादाराव सदाशिव पचांग असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.

शेतकऱ्याची आत्महत्या
उमरा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून बेलुरा येथील ५६ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १४ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली. दादाराव सदाशिव पचांग असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
बेलुरा येथील दादाराव पचांग यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना गत काही वर्षांपासून शेतीत अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यांनी विदर्भ कोकण बँकेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत दादाराव पचांग यांनी बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली, पत्नी असा आप्त परिवार आहे. माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.