रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 16:33 IST2020-06-28T16:33:07+5:302020-06-28T16:33:32+5:30
ज्ञानेश्वर गावंडे (२७) हे दुचाकीवर जात असताना रानडुकरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.

रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभागातील सराफा लाईन येथे राहणारे शेतकरी ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे हे २६ जून रोजी शेतात पेरणीसाठी सालतवाडा येथे आपल्या दुचाकीवरुन जात असताना त्यांच्यावर रानडुकरांनी अचानक हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. शेतात पेरणी करण्यासाठी ज्ञानेश्वर गावंडे (२७) हे दुचाकीवर जात असताना रानडुकरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. ते दुचाकीवरून खाली पडले. खाली पडल्यावरसुद्धा डुकरांनी त्यांच्या पायाला आणि हाताला मोठ्या गंभीर जखमा केल्या. यात त्यांचा हात व पायात मोठे फॅक्चर झाल्याने त्यांचा उजवा पाय आणि उजवा हात पूर्णपणे निकामी झाला आहे. (शहर प्रतिनिधी)