शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीसाठी शेतक-यांची धावपळ

By admin | Updated: June 12, 2015 02:03 IST

बीटी,सोयाबीनची मागणी वाढली.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीला सुरूवात केली असतानाच, अनेक ठिकाणी बीटी कापसाच्या बियांण्याचा काळाबाजार होत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ८३0 रू पयाचे पाकीट अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहे. सतत दोन वर्षापासून अतवृष्टी आणि अवर्षण स्थितीमुळे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांकडे पेरणीसाठी पैसा नसून, कर्जाचे पुर्नगठणही झाले नसल्याने शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शेतकरी सैरभैर झाला आहे. काहींनी सोनं गहाण ठेऊन बी-बीयाणे खरेदीसाठीची तयारी केली आहे. शासनाने बीटी कापसाच्या बियाणे पाकीटची किंमत १00 रूपयाने कमी केली आहे. त्यामुळे ९३0 रू पयाचे पाकीट ८३0 रूपयाला विकणे क्रमप्राप्त आहे; पण शेतकर्‍यांची सर्रास लूट होत असून, हे पाकीट १२00 ते १५00 रू पयाने विकले जात आहे. यामध्ये एका नामांकीत कंपनीच्या बीटी कापसाचा समावेश आहे. गतवर्षी कापसाला मागे टाकत सोयाबीनने आघाडी घेतली होती. विदर्भात जवळपास २0 लाख हेक्टरवर सोयाबीन तर कापूस १५ लाख हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरा केला होता. यावर्षी बीटी कापसाची मागणी वाढली आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा मोजक्या शेतकर्‍यांनी बी.टी. कापसाचे बियाणे खरेदी केले. मूग,उडीद, तुर, ज्वारी बियाण्यांची अद्याप हवी तेवढी मागणी नाही. आणखी पाऊस आल्यानंतरच शेतकरी इतर बियाणे खरेदी करतील असा प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे. यावर्षी आतापासूनच शेतकर्‍यांनी सोयाबीन खरेदीवर भर दिला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचीच आघाडी असून, पाऊस आल्यानंतरच शेतकरी कापूस व इतर बियाणे खरेदी करतील. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.