शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हवालदिल; गहू, हरभरा, केळी जमीनदोस्त

By admin | Updated: February 12, 2015 01:14 IST

५00 हेक्टरवरील संत्रा मातीमोल; आकोट, तेल्हारा तालुक्याला तडाखा.

आकोट: मंगळवारी मध्यरात्री आकोट तालुक्यात आलेल्या वादळी वार्‍यासह बरसलेल्या पावसाने फळबागांसह रब्बी पिकांना फटका दिला. उमरा व पणज सर्कलमधील हजारो हेक्टर जमिनीवरील १0 कोटी रुपयांचा संत्रा जमिनीवर पडला असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या भागातील गहू, केळी, मका, डाळिंबाचे पिक मातीमोल झाले आहेत. तालुक्यात रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून, विद्युत तारा व खांबसुद्धा पडल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे, छपरे उडून गेली आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरितपट्टय़ात मोठय़ा प्रमाणात रब्बी पिकांची लागवड आहे. या भागात गहू, संत्रा व केळी आदी पिकांचा हजारो हेक्टरवर पेरा आहे. वादळामुळे बहरलेला कोट्यवधी रुपयांचा संत्रा जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. गहू अक्षरश: झोपल्याने मातीमोल झाला आहे. आंब्याचा फुलोरही गळून पडला आहे. विद्युत तारा तुटल्याने उशिरा रात्रीपर्यंत वीज पुरवठा बंद होता. ५00 हेक्टरच्यावर संत्र्याचे तर ३00 हेक्टरच्यावर केळीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या वादळामुळे संत्रा व केळी उत्पादकांचा व बागायतदार शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पळविला गेला आहे. नुकसानीच्या संदर्भात संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी महसूल विभागाला निवेदन सादर केले आहे.