शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना नवतंत्रज्ञानाची मेजवानी !

By admin | Updated: January 28, 2017 02:12 IST

कृषी प्रदर्शन स्थळावर सूक्ष्म सिंचनाचे प्रात्यक्षिक; कॅशलेस व्यवहारावर भर.

अकोला, दि. २७- वसंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात नवे संशोधन, तंत्रज्ञानाचे २४0 दालन लावण्यात आले असून, पाण्याची बचत करू न कमी पाण्यात भरघोस पीक कसे घ्यावे, यासाठीचे तुषार व ठिबक सिंचन संचाचे प्रात्यक्षिक येथे शेतकर्‍यांना बघण्यासाठी लावण्यात आले आहेत. कॅशलेस व्यवहार करता यावेत, याकरिता जिल्हा बँकेच्यावतीने शेतकर्‍यांना माहिती देण्यासाठीचे दालन येथे आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात २७ ते ३0 जानेवारीपर्यंंत चालणार्‍या कृषी प्रदर्शनात रोपवाटिकेतून रोजगार निर्मिती करता यावी, यासाठीची माहिती उपलब्ध आहे. विषमुक्त अन्नापासून मुक्तता व्हावी, याकरिता सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती विकासावर भर देण्यात आला आहे. फूल शेती अलीकडे वाढली असून, शेतकर्‍यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करावी, या विषयावर येथे मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी जैविक खतांची माहिती आदी येथे उपलब्ध आहे. कीडनाशकांचा वापर कसा करावा, सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेतमालाची साठवण, उपकरणे व शेती अवजारे, शेतमाल प्रक्रिया व मूल्यसंवर्धन आदींची माहिती येथे उपलब्ध आहे.हरितगृह, शेड नेट शेतकर्‍यांकडे वाढला असून, वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी शेड नेट शेतीतून फुले, ढोबळी मिरची व इतर पिके घेणे सुरू केली आहेत. शेड नेटच्या वापरासंबंधी येथे माहिती उपलब्ध आहे. जैव इंधन तंत्रज्ञान, उच्च फळबाग तंत्रज्ञान, मृद व जलसंधारण, सुधारित बी-बियाण्यांची माहिती येथे मिळणार आहे. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, कृषी वनीकरण, पशुपालन व दुग्ध व्यवसायावर भर देण्यात आला आहे. रेशीम शेती कमी पाण्यात व कमी खर्चात खात्रीशीर उत्पादन देणारे पीक आहे. शेतकरी रेशीम शेतीकडे वळला आहे. त्यांनी ही शेती अधिक सक्षमतेने कशी करावी, याचे मार्गदर्शन रेशीम विभागामार्फत देण्यात येणार आहे. कृषी निर्यात सेवा आदींची माहिती येथे देण्यात येत आहे.बचत गट, शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे प्राधान्य देण्यात आले आहे. बचत गटांनी प्रक्रिया करू न केलेल्या मालाला चांगलीच मागणी आहे. कृषी प्रदर्शनाला जय गजानन कृषी मित्र परिवारासह विविध प्रतिष्ठानांचे सहकार्य लाभत आहे.