शेतक-यांना नवतंत्रज्ञानाची मेजवानी !
By Admin | Updated: January 28, 2017 02:12 IST2017-01-28T02:12:45+5:302017-01-28T02:12:45+5:30
कृषी प्रदर्शन स्थळावर सूक्ष्म सिंचनाचे प्रात्यक्षिक; कॅशलेस व्यवहारावर भर.

शेतक-यांना नवतंत्रज्ञानाची मेजवानी !
अकोला, दि. २७- वसंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात नवे संशोधन, तंत्रज्ञानाचे २४0 दालन लावण्यात आले असून, पाण्याची बचत करू न कमी पाण्यात भरघोस पीक कसे घ्यावे, यासाठीचे तुषार व ठिबक सिंचन संचाचे प्रात्यक्षिक येथे शेतकर्यांना बघण्यासाठी लावण्यात आले आहेत. कॅशलेस व्यवहार करता यावेत, याकरिता जिल्हा बँकेच्यावतीने शेतकर्यांना माहिती देण्यासाठीचे दालन येथे आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात २७ ते ३0 जानेवारीपर्यंंत चालणार्या कृषी प्रदर्शनात रोपवाटिकेतून रोजगार निर्मिती करता यावी, यासाठीची माहिती उपलब्ध आहे. विषमुक्त अन्नापासून मुक्तता व्हावी, याकरिता सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती विकासावर भर देण्यात आला आहे. फूल शेती अलीकडे वाढली असून, शेतकर्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करावी, या विषयावर येथे मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी जैविक खतांची माहिती आदी येथे उपलब्ध आहे. कीडनाशकांचा वापर कसा करावा, सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेतमालाची साठवण, उपकरणे व शेती अवजारे, शेतमाल प्रक्रिया व मूल्यसंवर्धन आदींची माहिती येथे उपलब्ध आहे.
हरितगृह, शेड नेट शेतकर्यांकडे वाढला असून, वर्हाडातील शेतकर्यांनी शेड नेट शेतीतून फुले, ढोबळी मिरची व इतर पिके घेणे सुरू केली आहेत. शेड नेटच्या वापरासंबंधी येथे माहिती उपलब्ध आहे. जैव इंधन तंत्रज्ञान, उच्च फळबाग तंत्रज्ञान, मृद व जलसंधारण, सुधारित बी-बियाण्यांची माहिती येथे मिळणार आहे. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, कृषी वनीकरण, पशुपालन व दुग्ध व्यवसायावर भर देण्यात आला आहे. रेशीम शेती कमी पाण्यात व कमी खर्चात खात्रीशीर उत्पादन देणारे पीक आहे. शेतकरी रेशीम शेतीकडे वळला आहे. त्यांनी ही शेती अधिक सक्षमतेने कशी करावी, याचे मार्गदर्शन रेशीम विभागामार्फत देण्यात येणार आहे. कृषी निर्यात सेवा आदींची माहिती येथे देण्यात येत आहे.
बचत गट, शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे प्राधान्य देण्यात आले आहे. बचत गटांनी प्रक्रिया करू न केलेल्या मालाला चांगलीच मागणी आहे. कृषी प्रदर्शनाला जय गजानन कृषी मित्र परिवारासह विविध प्रतिष्ठानांचे सहकार्य लाभत आहे.