शेतकऱ्याची रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:59 IST2018-10-12T16:58:58+5:302018-10-12T16:59:20+5:30
मोरगाव भाकरे (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरगाव भाकरे येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केली.

शेतकऱ्याची रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या
मोरगाव भाकरे (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरगाव भाकरे येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केली. ही घटना गायगावजवळ १२ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली. सोपान वासुदेव बोरकर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
सोपान बोरकर यांच्याकडे पाच एक शेती आहे. त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा अकोलाचे पिक कर्ज घेतले आहे.या कर्जाचे त्यांनी दोन वेळा पुर्नगठण केले आहे. यावर्षीही अपेक्षेनुसार त्यांना शेतात उत्पादन झाले नाही. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी नागपूर ते भुसावळ रेल्वे लाईनवर मालगाडी खाली शुक्रवारी सकाळी उडी घेउन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. बोरकर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील व आप्त परिवार आहे.