शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:28 IST

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे.

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने संयुक्त-सामायिक खात्यामधील (सात-बारावर एकापेक्षा जास्त नावे असलेली) शेतजमीन कसणारी शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’ योजनेसाठी पात्र ठरतात. त्यामुळे सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांना ४ जुलै रोजी पत्राद्वारे दिले आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मर्यादा शिथिल करण्यात आली असून, सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या ७ जून २०१९ रोजीच्या आदेशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या निकषात बसणारे सर्व शेतकरी पात्र आहेत. त्यानुषंगाने संयुक्त-सामायिक खात्यामधील (सात-बारावर एकापेक्षा जास्त नावे असलेली) आणि शेतजमीन कसत असलेली शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’ योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात. त्यामुळे सामायिक खात्यामधील समाविष्ट शेतकरी कुटुंबांची खात्री करून, त्यांना ‘पीएम-किसान ’ योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी आयुक्त, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना ४ जुलै रोजी पत्राद्वारे दिले आहेत.शेतकरी कुटुंबांची माहिती सादर करण्याच्या सूचना!कृषी सचिवांच्या निर्देशानुसार संयुक्त-सामायिक खात्यामधील समाविष्ट शेतकरी कुटुंबांना ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ देण्यासाठी अकोला तालुक्यातील सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करून तातडीने सादर करण्याच्या अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील मंडळ अधिकाºयांना दिले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातही प्रशासनामार्फत यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीagricultureशेतीAkolaअकोला