शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 10:21 IST2020-10-10T10:21:04+5:302020-10-10T10:21:16+5:30

शेतातील वांगे तोडून आणण्यासाठी ते गुरुवारी शेतात गेले होते.

Farmer dies of snake bite | शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

चोहोट्टा बाजार: येथून जवळच असलेल्या पिलकवाडी येथील रहिवासी पूर्णाजी वाघमारे(६५) यांचा गुरुवारी रात्री सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. पूर्णाजी वाघमारे हे भाजीपाल्याचे व्यावसायिक होते. शेतातील वांगे तोडून आणण्यासाठी ते गुरुवारी शेतात गेले होते. तेथेच त्यांना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Farmer dies of snake bite