शेतकऱ्याने भुईमूगाच्या पिकावर फिरवला नांगर
By Admin | Updated: May 21, 2017 19:26 IST2017-05-21T19:26:44+5:302017-05-21T19:26:44+5:30
तेल्हारा : अल्प उत्पादन होत असल्याचे लक्षात येताच तळेगाव बाजार येथील शेतकऱ्याने साडेतीन एकरातील भुईमूग न काढता त्यावर चक्क नांगर फिरवला.

शेतकऱ्याने भुईमूगाच्या पिकावर फिरवला नांगर
ऑनलाइन लोकमत
तेल्हारा : अल्प उत्पादन होत असल्याचे लक्षात येताच तळेगाव बाजार येथील शेतकऱ्याने साडेतीन एकरातील भुईमूग न काढता त्यावर चक्क नांगर फिरवला.
तेल्हारा तालुक्यात यावर्षी उन्हाच्या फटक्यामुळे अनेक पिकांचे उत्पादन अल्प झाले आहे. कमी भावामुळे कांदा पिक शेतकऱ्यांना परवडले नाही. त्यामुळे, परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी कांद्याएवजी भुईमूग पिकाची पेरणी केली. मात्र, भुईमूग पिकानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. भुइमूगाच्या एका झाडाला तीन ते चारच शेंगा लागल्याने विनायक ओंकार भोपाळे यांनी साडेतीन एकरातील भुईमूग तयार न करता त्यावर टॅक्टरने नांगरटी केली. भुइमूगाचे पिक तर त्यांना झालेच नाही उलट आतापर्यंत मशागतीसाठी त्यांनी खर्च केलेला पैसाही पाण्यात गेला. अशीच अवस्था इतर पिकांची आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनामदत देण्याची मागणी आहे.