शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 04:40 PM2021-11-13T16:40:36+5:302021-11-13T16:42:15+5:30

Farmer commits suicide : निलेश महादेव वरणकार (४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer commits suicide by strangulation | शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next

मूर्तिजापूर : तालुक्यातील लाखपूरी येथे एका ४० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली. निलेश महादेव वरणकार (४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
         तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणची शेती खरडुन घेली आहे. निलेश वरणकार यांच्याकडे ९ एकर शेती असून कोराडी नाल्याला आलेल्या पुराने शेती खरडून गेली होती, उर्वरित सोयाबीन शेतात सोंगून पडले असून सोयाबीनला माल धारणा कमी झाल्याने मळणी यंत्र येत नसल्याची व जिल्हा बॅंकेचा कर्जाचा डोंगर असल्याच्या विवंचनेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. अतिवृष्टीमुळे नापकी व शेतात सोयाबीन कापणी करुन पडले आहेत व ढगाळ वातावरण असल्याने त्यांची चिंता वाढली होती. त्यांच्या पश्चात ८ वर्षाचे दोन जुळे मुले व व पत्नी आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Farmer commits suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.