शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 18:22 IST2020-03-15T18:22:34+5:302020-03-15T18:22:45+5:30

रामकृष्ण वासुदेव बर्डे (४८) असे मृतकाचे नाव आहे.

Farm labor commit Suicide by poisoning | शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

खेट्री : नजीकच्या चान्नी येथे शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १४ मार्च रोजीच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. रामकृष्ण वासुदेव बर्डे (४८) असे मृतकाचे नाव आहे.
रामकृष्ण बर्डे हे १४ मार्च रोजी चौकातून येतो असे सांगून घरून निघाले होते; परंतु चान्नीजवळील एका शेतरस्त्यावर ते विष प्राशन केल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती गावात पसरल्याने गावातील तरुण मंडळींनी त्यांना गंभीर अवस्थेमध्ये चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले होते; परंतु अकोला येथे रुग्णालयात पोहोचण्याआधी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बर्डे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुले सुना व नातवंडे व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Farm labor commit Suicide by poisoning