अपघाताचा बनाव केलेल्या हत्याकांडाचा पर्दाफाश; असा उलगडला घटनाप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 18:44 IST2022-09-16T18:43:15+5:302022-09-16T18:44:37+5:30
शिवा कुकडे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा अपघात झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता.

अपघाताचा बनाव केलेल्या हत्याकांडाचा पर्दाफाश; असा उलगडला घटनाप्रसंग
सचिन राऊत
अकोला : महाराष्ट्र राज्य औद्यौगीक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक २ मधील गट्टू बनविण्याच्या एकाच खासगी कंपनीत काम करणाऱ्या दोन मजुर कुटुंबीयांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर कंपनी मालकाने एका दाम्पत्याला कामावरुन कमी केल्याच्या कारणावरुन या दाम्पत्याने शिवा कुकडे नामक मजुराची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
शिवा कुकडे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा अपघात झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी शरीरावरील जखमांवरुन या हत्याकांडाचा उलगडा केला. शिवा कुकडे यांच्यासोबतच काम करणारे हर्षा मंगळे तीचा पती प्रविण मंगळे व हर्षाचा मानलेला भाऊ आकाश पोळ या तीघांनी हे हत्याकांड केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून या तीघांनाही एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.