शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

फोर-जीच्या खोदकामाचे होणार ‘उत्खनन’

By admin | Updated: June 12, 2015 17:46 IST

चौकशी समितीची भूमिका; आयुक्तांच्या निर्णयाला विरोध.

अकोला : फोर-जीसाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने नियमानुसार खोदकाम न करता फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरविल्यामुळे पुन्हा एकदा खोदकामाची तपासणी करण्याचा निर्णय गुरुवारी आयोजित बैठकीत सर्वपक्षीय गटनेत्यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीने घेतला. सभागृहाच्या मंजूरीशिवाय कंपनीला खोदकामासाठी परवानगी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या निर्णयाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी तीव्र विरोध केला. शहरात फोर-जी सुविधेसाठी रिलायन्स कंपनीच्यावतीने ८९ किलोमीटर अंतर खोदकामाची परवानगी १६ जून २0१४ मध्ये मनपाकडून घेण्यात आली. खोदकामासाठी आठ महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. या आठ महिन्यांमध्ये कंपनीने ५८ किलोमीटर खोदकाम केले. उर्वरित खोदकामासाठी परवानगी मिळावी, याकरिता कंपनीने २५ मे रोजी मनपाकडे अर्ज सादर केला. कंपनीच्यावतीने शहरात मनमानी खोदकाम होत असल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केली होती. त्यावर कंपनीच्या खोदकामाची पाहणी करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिले. प्रशासनाने पाहणी केली असता, बहुतांश ठिकाणी अवघ्या एक ते दीड फूट अंतराच्या खोलीवर फायबर केबलचे जाळे टाकण्यात आल्याचे समोर आले. नियमानुसार खोदकाम न केल्याने कंपनीला ३ कोटी ३0 हजार ४६२ रुपये दंड आकारण्यात आला. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी एवढय़ावरच न थांबता उर्वरित खोदकामाच्या परवानगीसाठी कंपनीकडे वाढीव दरानुसार ४ कोटी ५६ लक्ष ४ हजार रुपयांची नोटीसद्वारे मागणी केली. आयुक्तांनी खोदकामासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर सादर करणे बंधनकारक होते. या ठिकाणी प्रशासन कंपनीला परस्पर परवानगी देत असल्याची बाब समोर आल्याने गुरुवारी सायंकाळी स्थानिक विश्रामगृह येथे महापौर, उपमहापौर, सर्वपक्षीय गटनेता तसेच आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यात बैठक पार पडली. प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी खोदकामाची पुन्हा तपासणी करण्याची मागणी लावून धरली. त्यावर सर्वपक्षीय गटनेत्यांच्या चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले. महापौर, उपमहापौर यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी व प्रशासनाच्यावतीने नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांनी पाच दिवसांत तपासणी अहवाल सादर करण्यावर एकमत झाले.