शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

नियोजन कोलमडले; कासव गतीने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:04 AM

अकोला : गोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिकेने मोठय़ा धडाक्यात रस्त्यालगतच्या मालमत्तांना हटविण्याची कारवाई सुरू केली. मागील दोन दिवसांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे नियोजन कोलमडल्यामुळे गोरक्षण रोडवर कासव गतीने कारवाई होत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.

ठळक मुद्देगोरक्षण रोड मालमत्ताधारकांसमोर मनपाचे अधिकारी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिकेने मोठय़ा धडाक्यात रस्त्यालगतच्या मालमत्तांना हटविण्याची कारवाई सुरू केली. मागील दोन दिवसांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे नियोजन कोलमडल्यामुळे गोरक्षण रोडवर कासव गतीने कारवाई होत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. काही मालमत्ताधारकांसमोर मनपाचे अधिकारी हतबल ठरल्याचे दिसून आले. नेहरू पार्क  चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत गोरक्षण रोडचे रुंदीकरण केले जात आहे. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या मालमत्तांमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला. रस्त्यालगतच्या मालमत्ता हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने २७ ऑक्टोबरपासून कारवाईला प्रारंभ केला असला, तरी मागील दोन दिवसांपासून प्रशासनाची कारवाई थंडावल्याचे चित्र समोर आले आहे. काही मालमत्ताधारकांनी इमारतीचे कमी नुकसान व्हावे म्हणून इमारतीचा भाग स्वत:हून पाडण्यास सुरुवात केली. त्यातील काही मालमत्ताधारक जाणीवपूर्वक कारवाईला विलंब व्हावा, या उद्देशातून एक ते दोन मजुरांच्या साहाय्याने इमारत पाडण्याचा देखावा करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा मालमत्तांच्या संदर्भात जेसीबीच्या मदतीने बांधकाम जमीनदोस्त करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे बुधवारी दिवसभर मनपाच्या सर्व जेसीबी रस्त्यालगत उभ्या असल्याचे दिसून आले. 

हॉटेल वैभवची इमारत शिकस्त?इन्कम टॅक्स चौकातील हॉटेल वैभवची इमारत जीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यामुळे इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने ही इमारत सोडून इतरत्र स्थानापन्न होणे गरजेचे झाले आहे. इमारतीच्या कॉलमला हादरा बसल्यास ती भुईसपाट होण्याची चिन्हे असल्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वत:हून मजुरांच्या साहाय्याने इमारतीचा काही भाग तोडण्याला सुरुवात केली. मात्र बुधवारी दिवसभर इमारत तोडणे किंवा इमारतीवरील मोबाइल टॉवर हटविण्याची कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून आले.

बांधकाम पाडण्यासाठी काहींचा पुढाकार तर..मनपाच्या जेसीबीमुळे इमारतींचे जास्त नुकसान होत असल्यामुळे काही मालमत्ताधारकांनी स्वत: पुढाकार घेत इमारतीचा अतिरिक्त भाग तोडण्यासाठी पुढाकार घेतला. गोविंद सोढा नामक बांधकाम व्यावसायिकाने अवघ्या दोन-तीन मजुरांच्या माध्यमातून मागील पाच दिवसांपासून बांधकाम तोडण्याचे काम सुरू केले. या ठिकाणी संबंधित मजूर निव्वळ वेळकाढूपणा करीत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार मनपाच्या निदर्शनास येत नसल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

जेसीबींचा वापर का नाही?इन्कम टॅक्स चौकात काही मालमत्ताधारकांनी प्रामाणिकपणे इमारतींचा भाग तोडण्याला सुरुवात केली तर काही मालमत्ताधारकांकडून वेळ निभावण्याची भूमिका पार पाडली जात आहे. बुधवारी इन्कम टॅक्स चौकात मनपाच्या चार ते पाच जेसीबी ठाण मांडून उभ्या असल्यामुळे ज्या इमारतींसाठी जेसीबींचा वापर शक्य आहे, त्या ठिकाणी का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका