Emphasis on ajwain crop in Vidarbha; soving over three thousand hectares | विदर्भात ओवा लागवडीवर भर;  तीन हजार हेक्टरवर ओवा
विदर्भात ओवा लागवडीवर भर;  तीन हजार हेक्टरवर ओवा

अकोला : पावसाच्या लहरीपणामुळे अगोदरच पिकांचे नुकसान झाले असताना अंकुरलेली पिके वन्यजीवाने फस्त केल्याचा फटका विदर्भातील खरीप पिकांना बसला असून, शेकडो हेक्टरवरील पिक ांवर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला. त्या ठिकाणी अर्धरब्बी पिकांसह ओवा लागवडीवर भर देण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच तीन हजार हेक्टरवर ओवा पेरणी करण्यात आली.
यावर्षी सुरुवातीला पाऊस लांबल्याने विदर्भातील पेरण्यांना उशीर झाला. पेरणीनंतर चार आठवडे पाऊस लांबल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके करपल्याने शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरवर नांगर फिरविला. इतर जगलेल्या पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याने अकोला तालुक्यातील शेतकºयांनी १५०० एकरावरील पिकांवर नांगर फिरविला आहे. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत; परंतु शेत कोरडे ठेवण्यापेक्षा शेतकºयांनी अर्धरब्बी पिकांसह ओवा पिकाची पेरणी केली. खारपाणपट्ट्यातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली, दर्यापूर, अक ोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळाूपर, अकोट तालुक्यांसह शेगाव येथे ओवा पेरणी करण्यात आली आहे.
पारंपरिक पिकांसह शेतकºयांनी मसाले पिकाकडे वळविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी (डॉ. पंदेकृवि) विद्यापीठातर्फे शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, यावर्षी ओव्याचे क्षेत्र वाढविण्यात कृषी विद्यापीठाला यश आले आहे. याकरिता अजमेर येथील राष्ट्रीय कृषी मसाले बियाणे संशोधन कें द्राशी संपर्क साधून ओवा बियाणे आणले असून, या कृषी विद्यापीठाने येथे ओवा बियाणे उत्पादन घेतले. हेच बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न देण्यात येत आहे. जवळपास तीन हजार हेक्टरवर ओवा पेरणी करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाकडे हे बियाणे उपलब्ध असून, आणखी पेरणी सुरू च आहे. इतर पिकापेक्षा ओवा मसाले पिकाला बाजारात दीडशे रुपये क्ंिवटल दर आहेत. उत्पादनही हेक्टरी १२ ते १४ क्ंिवटल आहे.

ओवा पिकाकडे शेतकरी वळला असून, त्यांना बियाणे उपलब्ध करू न देण्यात येत आहे. यावर्षी तीन हजार हेक्टरवर ओवा पेरणी करण्यात आली आहे. जेथे खरीप पिकांचे नुकसान झाले, तेथील शेतकरीदेखील बियाणे घेण्यासाठी येत आहेत.
- डॉ. आर. बी. घोराडे,
कृषी शास्त्रज्ञ,
डॉ. पंदेकृवि, अकोला.

 


Web Title:  Emphasis on ajwain crop in Vidarbha; soving over three thousand hectares
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.