शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी करणे भोवले

By admin | Updated: October 19, 2014 01:03 IST

मूर्तिजापूर येथे हायटेंशन केबलच्या टॉवरवरून विद्युतचोरीप्रकरण.

अकोला - वीज चोरी करणार्‍या चार आरोपींना मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, इलेक्ट्रिसिटी अँक्टच्या आणखी एका कलमाखाली १0 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.महावितरण कंपनीचे अभियंता टावरी २३ जून २0१३ रोजी माना येथून मूर्तिजापूरकडे येत असताना एका हायटेंशन केबलच्या टॉवरवर चार जण काम करीत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी माना पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नईम खान मेहमूद खान, भूषण दौलतराव, शेख जमील शेख रहीम आणि कादर खाँ हमीद यांच्याविरुध्द इलेक्ट्रिसिटी अँक्टच्या कलम १३६ (विद्युत साहित्याची चोरी) आणि कलम १३९ (विद्युत प्रवाहास नुकसान पोहोचविणे) यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून साहित्याचा शोध घेतला असता नईम खान याच्याकडे लोखंडी अँगलसह इतर विद्युत साहित्य आढळून आले. या प्रकरणी मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने कलम १३६ मध्ये चारही आरोपींना दोन वर्षांंंचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड ठोठावला तर कलम १३९ मध्ये १0 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.