वीजेच्या धक्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 17:44 IST2020-02-16T17:44:18+5:302020-02-16T17:44:29+5:30
शेख असिफ शेख शब्बीर(३२)व शेख महेमूद शेख रशीद (४२) अशी मृतक शेतकºयांची नावे आहेत.

वीजेच्या धक्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
वाडेगाव(अकोला) : शेतात पाणी देत असताना वीजेचा शॉक लागल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना देगाव-वाडेगाव शिवारात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली. शेख असिफ शेख शब्बीर(३२)व शेख महेमूद शेख रशीद (४२) अशी मृतक शेतकºयांची नावे आहेत.
वाडेगाव येथील शेतकºयांची देगाव शिवारात शेती आहे.गट नंबर ५७६ मध्ये गहु पिकाची पेरणी केली आहे. या गव्हाला पाणी देण्यासाठी रविवारी दुपारी १२ वाजता शेख असिफ शेख शब्बीर, शेख महेमूद शेख रशीद व आरिफ आदी गेले होते. मोटार पंप सुरू करीत असताना एका शेतकºयाला जबर शॉक लागला. त्याला सोडवण्याच्या प्रयत्नात अन्य दोन शेतकºयांना वीजेचा जबर धक्का बसला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक महादेव पडघन,देविदास येउल,अशोक नवलकर आदींनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. (वार्ताहर)