अकोला जिल्ह्यातील रिक्त १६ सरपंच पदांची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:17 IST2021-04-08T11:13:30+5:302021-04-08T11:17:25+5:30

Gram Panchayat Sarpanch : ८ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या विशेष सभांमध्ये सरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

Election for 16 vacant Sarpanch posts in Akola district today | अकोला जिल्ह्यातील रिक्त १६ सरपंच पदांची आज निवडणूक

अकोला जिल्ह्यातील रिक्त १६ सरपंच पदांची आज निवडणूक

ठळक मुद्देग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये होणार निवडसरपंच पदांची निवडणूक घेण्यात येत आहे.

अकोला: जिल्ह्यातील रिक्त १६ सरपंच पदांची निवडणूक गुरुवार, ८ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या विशेष सभांमध्ये सरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गत ९ आणि ११ एप्रिल रोजी सरपंच पदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सरपंच पदांच्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य निवडून आले नसल्याने जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर इत्यादी सहा तालुक्यातील १६ सरपंच पदे रिक्त राहिली होती. रिक्त सरपंच पदांसाठी १६ मार्च रोजी नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार रिक्त १६ सरपंच पदांची निवडणूक ८ मार्च रोजी ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये घेण्यात येणार आहे.

 

''या'' ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची होणार निवडणूक!

तेल्हारा तालुक्यात चांगलवाडी, सौंदळा, वांगरगांव, अकोट तालुक्यात चोहोट्टा, सावरा, मक्रमपूर, मंचनपूर, पतोंडा, अकोला तालुक्यात खांबोरा, बाळापूर तालुक्यात अंत्री मलकापूर, बार्शीटाकळी तालुक्यात लोहगड व पातूर तालुक्यात चरणगांव, दिग्रस खुर्द, आलेगांव, विवरा व विवरा या १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची निवडणूक घेण्यात येत आहे.

Web Title: Election for 16 vacant Sarpanch posts in Akola district today