अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू

By Atul.jaiswal | Updated: May 16, 2023 13:21 IST2023-05-16T13:10:52+5:302023-05-16T13:21:38+5:30

अकबर खान यांच्या घराला १५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.

Elderly woman dies in house fire in Akola | अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू

अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू

अकोला: शहरातील शिवसेना वसाहत परिसरातील एका घराला आग लागून, ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. आगीची घटना १५ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास लागली. पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

अकबर खान यांच्या घराला १५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने, घरात असलेल्या त्यांच्या ६५ वर्षीय आईचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, महावितरणचे अभियंता श्रीकांत बनसोड यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत घरातील साहित्याचे मोठ नुकसान झाले आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीदरम्यान ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Elderly woman dies in house fire in Akola