जुगारावर धाड आठ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:39 IST2020-07-27T16:39:23+5:302020-07-27T16:39:36+5:30

रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Eight arrested for gambling | जुगारावर धाड आठ अटकेत

जुगारावर धाड आठ अटकेत

अकोला : सुभाष चौकात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा छापा टाकला. या जुगारावरून आठ जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगारींकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौकातील मो. अयुब मो. हबीब याच्या घरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जुगारींना अटक केली. यामध्ये इमरान हुसेन मजहर हुसेन, मो. अयुब मो. हबीब दोन्ही राहणार कलाल चाळ, सलीम उस्मान चौधरी रा. गवळीपुरा, समीर अहमद नजीर अहमद, मोहमद आदील शेख हुसेन दोन्ही रा. खंगरपुरा, जीशान अहमद अब्दुल रज्जाक, मो. जीया मो. जावेद दोन्ही रा. माणिक टॉकीज परिसर या आठ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाभर मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे फोफावले असून, पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Eight arrested for gambling