शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता दरमहा होणार शिक्षण परिषद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:29 PM

अकोला : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाने सातत्याने प्रयोग सुरू केले आहेत. त्यापैकी एक प्रयोग शिक्षण परिषद हा आहे. आता दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविकास संस्था, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, उप शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे.अध्ययन स्तर निश्चिती आढावा, दीक्षा, मित्र, सरल याबाबत मार्गदर्शन, भाषा, मूलभूत वाचन विकास व गणितसंबोध विकास याबाबत आढावा घेण्यात येईल.

अकोला : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाने सातत्याने प्रयोग सुरू केले आहेत. त्यापैकी एक प्रयोग शिक्षण परिषद हा आहे. आता दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेंतर्गत शिक्षण परिषद घेतल्या जाणार आहेत. समूह साधन केंद्र स्तरावर प्राथमिक व माध्यमिकचे मुख्याध्यापक, शिक्षकांना शिक्षण परिषदेला उपस्थिती बंधनकारक केली आहे.शाळांमधील शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, या दृष्टिकोनातून प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि इयत्ता ५ वी ते ८ वी वर्गांचे शिक्षक, माध्यमिक इयत्ता ९ वी व १0 वी वर्गांचे सर्व विषय शिक्षकांसाठी दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. या शिक्षण परिषदेवर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, उप शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे. शिक्षण परिषद झाल्यानंतर दोन दिवसांनी संबंधित मुख्याध्यापकांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडे अहवाल पाठवावा लागणार आहे. शिक्षण परिषदेमध्ये इ. ३, ५ व ८ वी एनएएस रिपोर्ट, अध्ययन स्तर निश्चिती आढावा, दीक्षा, मित्र, सरल याबाबत मार्गदर्शन, भाषा, मूलभूत वाचन विकास व गणितसंबोध विकास याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीच्या दृष्टिकोनातून तयारी, स्पोकन इंग्लिश ई टीच आढावा, केआरए व शाळासिद्धी आढावा, किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन, प्रगत शाळांच्या यशोगाथा व नावीन्यपूर्ण उपक्रम, मदर स्कूल, प्रक्रिया अहवाल यासह गणित, विज्ञान व इंग्रजी डेमो लेशन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी