पर्यावरणोत्सव : तीन प्रजातीच्या हंसांची अकोल्याला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:38 IST2020-01-28T18:38:09+5:302020-01-28T18:38:53+5:30

अतीथंड प्रदेशातून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असलेल्या हंसाच्या तीन प्रजातींनी यावर्षी प्रथमच अकोल्यात हजेरी लावली आहे.

Eco-festival: Three species of goose visit Akola | पर्यावरणोत्सव : तीन प्रजातीच्या हंसांची अकोल्याला भेट

पर्यावरणोत्सव : तीन प्रजातीच्या हंसांची अकोल्याला भेट

अकोला : अतीथंड प्रदेशातून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असलेल्या हंसाच्या तीन प्रजातींनी यावर्षी प्रथमच अकोल्यात हजेरी लावली आहे. डिसेंबर महिन्यापासून हंसाच्या प्र्रजाती अकोल्यातील पाणवठ्यांच्या ठिकाणी आढळून येत आहेत.
युरोप उत्तर आफ्रिका आणि आशियातील उत्तरेकडे हिवाळ्याता बर्फवृष्टी होत असते. अन्न व खाद्याचा तुटवडा होत असल्याने तिकडचे पक्षी अन्नाच्या शोधात व थंडी पासून बचाव करण्यासाठी अशिया खंडाच्या मध्यभागी व उष्ण ठिकाणी स्थलांतर करत असतात. हंस हा त्यापैकीच स्थालांतर करणारा पक्षी असून, या वर्षी अकोल्यात तिन प्रजातीच्या हंसानी भेटी दिल्या. डिसेंबरच्या सुरवातीला बार हेडेड गूज अर्थात पट्टकदंब (हंस), डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात व्हाईट फ्रंटेड हेड अर्थात पांढºया माथ्याचा कलहंस व जानेवारीच्या पूर्वाधात ग्रेलाग गुज अर्थात कलहंसने अकोल्यात प्रथमच हजेरी लावली. कलहंस राखाडी मोठा असुन हलका आणि चपळ आहे. जाड आणि लांब मान,व डोके गडद आणि फिकट तपकिरी आणि नारंगी किंवा गुलाबी चोच आहे. राखाडी आणि पांढरे पिसाराआणि गुलाबी घट्ट बांधनीचे व मजबूत पाय असतात. साधारणत: लांबी ७६ ते ८९ सेमी, पंखांची लांबी १४७ ते १८० सेंमी तर वजन: २.९ ते ३.७ किलोपर्यंत असते. मुख्यत: गुज हे आहारात गवत, गहू इतर पिकांचे कोवळे कोंब पाने, देठ तसेच मुळे बियाणे आणि धान्या सह वनस्पतींचे विविध प्रकार घेतात. तलाव व तलावाच्या आसपास असलेल्या कुरण, खुली गवताळ जमीन नव्याने पेरणी केलेले शेतात रात्री मुक्काम करतात व स्थालांतर पण सहसा रात्रीच्याच वेळी करतात, असे पक्षी मित्र देवेंद्र तेलकर यांनी सांगितले.
 

 

Web Title: Eco-festival: Three species of goose visit Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.