शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सात बार्‍याच्या फेरफार नोंदीमुळे कॅनॉल रस्त्याला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:08 IST

जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचे काम तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी केलेल्या प्रतापामुळे रखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतकर्‍यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्‍याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्‍यावर ही जमीन शासनाच्या मालकीची करणे क्रमप्राप्त होते. तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी तशा नोंदीच न केल्यामुळे आजही सदर जमीन शेतकरी व काही मालमत्ताधारकांच्या नावाने कायम असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देतत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांचा प्रतापकॅनॉल रस्त्याचा तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचे काम तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी केलेल्या प्रतापामुळे रखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतकर्‍यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्‍याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्‍यावर ही जमीन शासनाच्या मालकीची करणे क्रमप्राप्त होते. तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी तशा नोंदीच न केल्यामुळे आजही सदर जमीन शेतकरी व काही मालमत्ताधारकांच्या नावाने कायम असल्याची माहिती आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय कोणता निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. जुने शहरातील डाबकी रोड, किल्ला चौक ते जुना बाळापूर नाका आदी प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचे निर्माण होणे अत्यावश्यक झाले आहे. प्रशस्त रस्त्यासाठी डाबकी रोड ते जुना बाळापूर नाक्यापर्यंतच्या कॅनॉल रोडचा पर्याय उपलब्ध असताना महापालिकेची यंत्रणा जिल्हा प्रशासनासमोर हतबल ठरत असल्याचे दिसून येते. डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटपर्यंत प्रशस्त रस्ता तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला होता. २0१२ मध्ये तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांनी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंत १ हजार ३00 मीटर लांब रस्त्यासाठी निविदा प्रकाशित केली होती. त्याकरिता १ कोटी ६0 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यादरम्यान, पाटबंधारे विभागाने ही जमीन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी जागेची पाहणी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयातून प्राप्त जमिनीच्या दस्तावेजांची पाहणी केली असता तत्कालीन मंडळ अधिकारी व तलाठय़ांनी कॅनॉलसाठी भूसंपादित के लेल्या जमिनीची शासनदरबारी नोंदच केली नसल्याचा प्रकार समोर आला होता. सात-बार्‍यावर फेरफार नोंदी न केल्यामुळे नजरचुकीने म्हणा किंवा कामचुकारपणामुळे कॅनॉलची जागा संबंधित मूळ शेतकरी व काही मालमत्ताधारकांच्या नावावर कायम असल्याचे चित्र आहे. 

कारवाई का नाही?तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांच्या प्रतापामुळे सिंचनासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकर्‍यांच्या नावावर कायम राहिली. हा गंभीर प्रकार पाहता जिल्हा प्रशासनाने तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मागील अनेक दिवसांपासून हा तिढा कायम असताना संबंधितांवर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Akola Old cityअकोला जुने शहरroad safetyरस्ते सुरक्षा