शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

डम्पिंग ग्राउंड फुल्ल; कचरा टाकायचा कुठे? कचरा जमा करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 11:10 IST

Dumping ground full : डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांसमाेर संकट उभे ठाकले आहे.

अकाेला : शहरातील घनकचऱ्यावर अतिशय थातूरमातूरपणे प्रक्रिया सुरू असल्याचे परिणाम समाेर आले आहेत. नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांसमाेर संकट उभे ठाकले आहे. साेमवारी जागेअभावी कचरा टाकू न शकलेल्या वाहनचालकांनी महापालिकेसमाेर एकच गर्दी केल्याने घनकचऱ्याच्या संदर्भात प्रशासनातील झारीचे शुक्राचार्य शाेधण्याची गरज असल्याचे दिसून आले.

माेठा गाजावाजा करीत सत्ताधारी भाजपसह प्रशासनाने ४५ काेटींच्या घनकचरा प्रकल्पाला सुरुवात केली. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार सप्टेंबर २०२० मध्ये सहाय्यक आयुक्त वैभव आवारे यांनी मे.परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीला कार्यारंभ आदेश दिला हाेता. वर्कऑर्डर दिल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणाऱ्या भाेड येथील १९ एकर जागेत भलीमाेठी खदान असल्याचे उघडकीस आले. ही खदान बुजविण्यासाठी प्रशासनाने सात काेटींच्या खर्चाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमाेर मांडला असता हा प्रस्ताव विराेधी पक्ष काॅंग्रेस, शिवसेनेने धुडकावून लावला हाेता. ४ फेब्रुवारी २०२१ राेजी निमा अराेरा यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पाहणी केली हाेती. दरम्यान, १८ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ सदाेष असल्याचे मान्य करीत निमा अराेरा यांनी ‘मार्स’नामक एजन्सीवर ठपका ठेवत सदाेष ‘डीपीआर’ची पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत चाैकशी करण्याचा निर्णय घेतला हाेता. पुढे त्या चाैकशीचे काय झाले देव जाणेे; परंतु त्यानंतर मे. परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीने घनकचऱ्याच्या वर्गीकरणाला थातूरमातूरपणे सुरुवात केली.

 

आयुक्तांच्या डाेळ्यांत धूळ फेक

वर्तमानस्थितीत मे.परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीमार्फत डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची छाननी केली जात आहे. अर्थात, वर्गीकरण केलेल्या कचऱ्यातून माती,प्लॅस्टिक, काचेचे तुकडे वेगळे केली जात असतील तर आजवर किती टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले, याचा शास्त्रशुद्ध लेखाजाेखा बांधकाम विभागातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडे नाही. याप्रकरणी निमा अराेरा यांची दिशाभूल केली जात आहे.

 

बैठकीत ताेडगा निघेल का?

साेमवारी सकाळपासूनच मनपासमाेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या हाेत्या. आराेग्य व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल बिडवे, सेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी ताेडगा काढण्याचा प्रयत्न केला. अखेर दुपारी आयुक्त निमा अराेरा यांनी वाहनचालकांची भेट घेऊन मंगळवारी बैठकीत ताेडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत ताेडगा निघेल का, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका