शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यात १९ लाख नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:15 IST

देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातदेखील वर्षभराआधी नोंदणी झाली; मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांवर घरकुलाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने शक्तीप्रदत्त समितीची स्थापना केली. मात्र शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकाच झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांचे घराचे स्वप्न तूर्त भंगले आहे.

- संजय खांडेकरअकोला : सर्वसामान्य माणसाला स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशभरात नोंदणी केली. देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातदेखील वर्षभराआधी नोंदणी झाली; मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांवर घरकुलाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली. निविदा प्रक्रिया राबविणे, खासगी विकासकांची निवड करणे, जमिनींची निवड करणे आदींसाठी स्थानिक कार्यक्षेत्रनिहाय जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे उपसचिव रा. कों. धनावडे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढले गेले आहे. प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने शक्तीप्रदत्त समितीची स्थापना केली. ही समिती आंतरविभागीय मुद्दे ठरावीक कालावधीत बैठका घेऊन सर्वसंमतीने निकाली काढेल. सोबतच गृहनिर्माण धोरणाशी संबंधित योजनेला गती देतील, ही अपेक्षा होती; मात्र शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकाच झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांचे घराचे स्वप्न तूर्त भंगले आहे.*जिल्हानिहाय घरकुलाच्या प्रतीक्षेतील नागरिकनंदुरबार १०५०३, धुळे २१८२३, जळगाव ५१२७७, बुलडाणा २०९६९, अकोला २७५५२, वाशिम ८०७९, अमरावती ३९५६९, वर्धा १६०६४, नागपूर १२१३०६, भंडारा ८९२२, गोदिंया ८६१५, गडचिरोली ४५०१, चंद्रपूर २९३८३, हिंगोली ६८२७, परभणी २१७५१, जालना १४३९८, औरंगाबाद ६१७०३, नाशिक ९९१६८, ठाणे ३१९२९४, पालघर ५२५५, संपूर्ण मुंबई ४७६२८१, रायगड ३७१३०, पुणे २१९०७५, अहमदनगर ३४८५०, बीड १९६४५, लातूर २३८७३, उस्मानाबाद १०७४८, सोलापूर ५३३७६, सातारा २१७६५, रत्नागिरी १००६२, सिंधुदुर्ग ४०४८, कोल्हापूर ४६९४३, सांगली २७४५९.-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रदेश विकास प्राधिकरण, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायततर्फे घरकुलांची नोंदणी १९ लाखांच्यावर जात आहे; मात्र नियमावलीनुसार जोपर्यंत टप्पेवारी रक्कम उपरोक्त यंत्रणेकडून येत नाही, तोपर्यंत म्हाडाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळू शकत नाही.- जयसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता, म्हाडा अमरावती विभाग.-शासनाच्या योजना चांगल्या आहेत; मात्र अंमलबजावणीसाठी जी सक्षम यंत्रणा पाहिजे, ती कार्यरत नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे घरकुलाची योजना प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास उशीर होत आहे.-पंकज कोठारी, समन्वयक हाउसिंग कमिटी राष्ट्रीय क्रेडाई, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना