डॉक्टर जावयाला सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी, पेरणी करण्यास केली मनाई
By नितिन गव्हाळे | Updated: July 25, 2023 16:41 IST2023-07-25T16:41:16+5:302023-07-25T16:41:38+5:30
डॉक्टर राहुल जंजाळ मुलासह शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता, त्यांचे भाऊ सासरे ब्रिजलाल महादेव गवळी व त्यांचा मुलगा गौतम ब्रिजलाल गवळी यांनी शेतात पेरणी करण्यास त्यांना मनाई केली.

डॉक्टर जावयाला सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी, पेरणी करण्यास केली मनाई
अकोला - डॉक्टर जावयाला व त्यांच्या मुलास शेती पेरणी करण्यास मनाई करीत भाव सासऱ्याने व त्यांच्या मुलाने अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात 24 जुलै रोजी दहीहंडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिक येथे राहणारे डॉक्टर राहुल महादेव जंजाळ (65) यांच्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे वडद खुर्द येथे त्यांचे भाव सासरे ब्रिजलाल गवई यांच्याकडून दोन एकर शेती विकत घेतली होती. ही शेती दरवर्षी ते वहीती करतात.
23 जुलै रोजी डॉक्टर राहुल जंजाळ मुलासह शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता, त्यांचे भाऊ सासरे ब्रिजलाल महादेव गवळी व त्यांचा मुलगा गौतम ब्रिजलाल गवळी यांनी शेतात पेरणी करण्यास त्यांना मनाई केली आणि अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात दहीहंडा पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखडे करीत आहेत.