शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अन्य जातींना आदिवासी जमातीमध्ये स्थान देऊ नका

By admin | Updated: August 4, 2014 23:06 IST

बुलडाणा : जिल्हा आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा धडक मोर्चा

बुलडाणा : आदिवासी आरक्षणातील घुसखोरी सारख्या घटनाबाह्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून अन्य जातींना आदिवासी जमातीमध्ये स्थान देऊ नका यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे आज ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधी भवन येथून जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, कारंजा चौक, स्टेटबँक मार्गावरून जिल्हाधिकारी कार्याल्यावर धडकला. यावेळी आपल्या विविध प्रलंबित मागण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आदिवासी जमातीमध्ये अन्य जातींचा समावेश करू नये, १५ जून १९९५ चा जी.आर. सक्तीने राबवावा, आदिवासींना राहती जागा कायम करून ८ अ द्यावा, आदिवासींना अतिक्रमणधारकांना वर्षाची कोणतीही अट न लावता तात्काळ जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे द्यावे, प्रत्येक तहसील कार्यालयात आदिवासींसाठी स्वतंत्र मदत केंद्र परवानगी द्यावी, जिल्हातील खर्‍या आदिवासींना आश्रम शाळेचे पालकत्व द्यावे, आदिवासी कर्मचार्‍यांवर होणारे अन्याय त्वरित थांबवून त्यांना सेवेत सरळ भरती करून द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमलेल्या हजारों आदिवासी बांधवांना वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस कमिटी आदिवासी विभागाचे अध्यक्ष दिलीप मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्करराव ठाकरे, कैलास चवरे, नितीन मसराम, सिकंदर बागुल, विनोद डाबेराव, वासुदेव खुळे, बागुल, दुर्योधन गायकवाड, गजानन डाबेराव, सुखदेव डाबेराव, डॉ.टापरे, ज्ञानेश्‍वर चिभडे, रत्नाताई मोरे, प्रिमीला डाबेराव, र्‍यारेलाल डाबेराव, वासुदेव खुळे, नंदिनी टारपे, दुर्योधन गायकवाड, जनार्धन मोरे, अरूण बरडे, पंजाबराव पवार, प्रकाश गायकवाड, गजानन सोळंके, सुखदेव डाबेराव, श्रीकृष्ण बरडे, हरी बरडे, भगवान कोकाटे, ज्ञानेश्‍वर राठोड, ज्ञानेश्‍वर सोळंके, नवल माळवे, भास्कर पिंपळे, गजानन सोळंके, गणसिंग चांगड, भगवान सोळंके आदी समाज बांधव उपस्थित होते.