शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

पुरवठा विभागाच्या दिरंगाईचा शिधापत्रिकाधारकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 3:35 PM

जिल्ह्यात ४ हजार ४१८ शिधापत्रिकाधाका अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्या नसल्याने, संबंधित शिधापत्रिकाधारकांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) असलेल्या शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात ४ हजार ४१८ शिधापत्रिकाधाका अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्या नसल्याने, संबंधित शिधापत्रिकाधारकांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार लिंक करण्याच्या कामातील जिल्हा पुरवठा विभागाच्या दिरंगाईचा फटका गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सहन करावा लागत आहे.शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शिधापत्रिका संबंधित शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांकासोबत संलग्नित करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे; परंतु अद्याप शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत ‘लिंक’ करण्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. जिल्ह्यात एकूण ४ लाख ८६६ शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी २ लाख ७७ हजार ९६५ शिधापत्रिकाधारक धान्य वाटपास पात्र आहेत. त्यामध्ये बीपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. दरमहा धान्य वाटपासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी २ लाख ७३ हजार ५४७ शिधापत्रिका आधा क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्यात आल्या असल्या तरी, उर्वरित ४ हजार ४१८ शिधापत्रिका आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे करण्याचे काम अद्याप बाकी आहे. शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत लिंक नसलेल्या गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून मिळणाऱ्या धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याच्या कामात जिल्हा पुरवठा विभागाच्या दिरंगाईचा गरीब शिधापत्रिकाधारकांना नाहक फटका सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला