शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दुष्काळी मदत वितरित; पण शेतकऱ्यांना मिळेना लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 3:27 PM

मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील २ लाख १२ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत तीन हप्त्यात प्राप्त झालेला १३७ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन हप्त्यांत १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कायालयार्फत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान मदतीची रक्कम संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली; मात्र मदतीची रक्कम तहसील कार्यालयांना वितरित करण्याच्या प्रक्रियेस एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पाच तालुक्यांना वितरित अशी आहे मदतीची रक्कम!तालुका                                रक्कम (लाखांत)अकोला                               ३६,३७,९२,७४८बार्शीटाकळी                        २२,६७,४८,६३८तेल्हारा                               २१,१६,२५,११५बाळापूर                              २८,०१,३७,६६७मूर्तिजापूर                           २९,०८,२०,३९४.............................................................एकूण                               १३७,६१,२४,५६०जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत तीन हप्त्यात प्राप्त १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांची रक्कम तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली. बँकांकडून किती शेतकºयांच्या खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात सोमवारी संबंधित बँक अधिकाºयांची बैठक घेणार असून, आढावा घेण्यात येणार आहे.-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारीदुष्काळी मदतीची रक्कम अद्याप माझ्या बँक खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे मदतीचा लाभ मला मिळाला नाही.- संजय मधुकरराव पागृतशेतकरी, खरप, ता. अकोला.दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रशासनामार्फत वितरित करण्यात आली; परंतु माझ्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झाली नाही.- राजदत्त मानकरशेतकरी, वाडेगाव, ता. बाळापूर.दुष्काळी मदत शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही.-शिवाजी भरणेशेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ