शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

राष्ट्रवादीत प्रवेशासाठी भदे, सिरस्कार यांची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:14 IST

इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे भदे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वंचित बहुजन आघाडीचा ४५ पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पक्ष प्रवेशाबाबत रविवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात चर्चा केली. चर्चेत उपस्थित केलेल्या विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सोबत या, त्यानंतर प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन पक्षाचे नेते पवार यांनी दिले. त्यावर सोबत येणाºया इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे भदे यांनी सांगितले.भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांत असलेल्या पदांचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदारद्वय हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले होते. त्यानंतर पुढील राजकीय कारकिर्दीसाठी इतर पक्षासोबत चर्चाही सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यातील नेते रामेश्वर पवळ यांच्या माध्यमातून पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी बोलणी झाली. त्यावेळी ८ मार्च रोजी सविस्तर बैठक ठरविण्यात आली. त्यानुसार रविवारी माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर, प्रा. सदानंद माळी, दिनकर नागे यांच्यासह २०० पदाधिकाºयांनी बैठकीला हजेरी लावली. बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह रामेश्वर पवळ उपस्थित होते. पक्ष प्रवेशाबाबत उपस्थितांनी भूमिका मांडली. त्यावर विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करा, अशा सूचना पवार यांनी पाटील व भुजबळ यांना केल्या.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBaliram Siraskarबळीराम सिरस्कारHaridas Bhadeहरीदास भदे