निकृष्ट ज्वारीचा प्रश्न विधिमंडळात गाजणार!

By admin | Published: March 16, 2017 02:34 AM2017-03-16T02:34:53+5:302017-03-16T02:34:53+5:30

रणधीर सावरकर यांची लक्षवेधी.

Desperate jawar question in law! | निकृष्ट ज्वारीचा प्रश्न विधिमंडळात गाजणार!

निकृष्ट ज्वारीचा प्रश्न विधिमंडळात गाजणार!

Next

अकोला, दि. १५- शासकीय धान्य गोदामांमध्ये गत वर्षभरापासून पडून असलेल्या निकृष्ट ज्वारीचे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना वाटप सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारी वाटपाचा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमीदराने ज्वारी खरेदी करण्यात आली होती. अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने, हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले. वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर शासकीय धान्य गोदामांमधील ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश गत १ डिसेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत गत २ फेब्रुवारीपासून एक रुपया प्रतिकिलो दराने रास्त भाव दुकानांमधून जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना पीठ झालेल्या निकृष्ट ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले. टोकरलेली आणि निकृष्ट ज्वारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारली जात आहे. यासंदर्भात गत ११ फेब्रुवारी रोजी ह्यलोकमतह्णमध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हय़ातील गरीब शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारी वितरणाचा प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी ह्यलक्षवेधीह्णद्वारे विधिमंडळात दाखल केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ातील निकृष्ट ज्वारी वितरणाचा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.
जिल्हय़ात गरीब शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारीचे वितरण करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर विधिमंडळाकडे लक्षवेधी दाखल केली आहे. या प्रश्नावर विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात चर्चा होणार आहे. चर्चेत हा प्रश्न लावून धरणार आहे.
-रणधीर सावरकर, आमदार.

Web Title: Desperate jawar question in law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.