शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची उत्कंठा शिगेला

By admin | Updated: May 12, 2014 00:30 IST

मतमोजणी पाच दिवसांवर

अकोला : लोकसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १६ मे रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणी पाच दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालात कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या १0 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सात उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले. मतपेट्या अकोल्यातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथील ह्यस्ट्राँग रूमह्णमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरापासून ह्यईव्हीएम मशीनह्णमध्ये सीलबंद झालेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. निवडणुकीचा निकाल केवळ पाच दिवसांवर येऊन ठेपल्याच्या स्थितीत अकोला लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदारसंघात सात उमेदवार भाग्य अजमावित असले तरी, प्रामुख्याने भाजप, काँग्रेस व भारिप-बमसं या तीन पक्षांच्या उमेदवारांमध्येच काट्याची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि कोण बाजीगर ठरतो, याबाबतच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत गल्लोगल्ली होणार्‍या चर्चांमध्ये दावे-प्रतिदावे आणि वेगवेळ्या अंदाजांचा खल पडताना दिसत आहे.