शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
2
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
3
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
4
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
5
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
6
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
7
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
8
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
9
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
10
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
12
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
13
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
14
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
15
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
16
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
17
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
18
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
19
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
20
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:01 IST

Akola : अपघाताचा बनाव करून पैस उकळण्याचा प्रयत्न; माजी आमदारांची सतर्कता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-वाशिम रोडवर अपघात झाला असून, तीन जण ठार झाले व चार जण ऑक्सिजनवर आहेत. आम्ही ठाण्याचे राहणारे असून, तातडीने मदतीची गरज आहे, अशी माहिती अज्ञाताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून दिली. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेते म्हणून अकोला येथे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना माहिती दिली.

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजोरिया ताफा घेऊन पातूर रोडवर अपघात स्थळाकडे रवाना झाले. त्यानंतर हा बनाव असून उपमुख्यमंत्र्यांकडून पैसे उकळण्यासाठी फेक कॉल करण्यात आल्याची माहिती समोर आली. बाजोरिया यांनी पोलिस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली असून, फोन करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

अपघात झाल्याची माहिती मिळताच गोपीकिशन बाजोरिया यांनी पातूरकडे तब्बल ४२ किलोमीटर अंतरावर शोध घेतला. त्यांच्यासोबत शिंदेसेनेचे पदाधिकारी होते. कुठेच अपघात स्थळ आढळले नाही. दरम्यान, कॉल करणारी व्यक्ती सतत ठिकाण बदलत नवीन माहिती देत राहिली. इतकेच नव्हे, तर त्याने 'फोन पे'द्वारे पैसे मागितले, त्यामुळे संशय अधिकच गडद झाला.

शेवटी हा कॉल फेक असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचा मोबाइल बंद केला. अशा खोट्या कॉलमुळे गरजूंना मदत मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी म्हटले आहे.

"माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एक मोबाइल नंबर दिला आहे. त्यावरून बनावट कॉल करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आम्ही चौकशी करीत आहोत."- अचिंत चांडक, पोलिस अधीक्षक, अकोला

"अकोला जिल्ह्यातून कुणीतरी अपघात झाल्याचा कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. त्यानुसार आम्ही घटनास्थळाकडे खाना झालो. संबंधित व्यक्ती जागा बदलत बोलत होती. हा प्रकार बनावट असल्याचा संशय आल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अखेर फोन बंद केला. ज्या नंबरवरून फोन झाला होता, तो नंबर चौकशीसाठी पोलिस अधीक्षकांकडे पाठविला आहे."- गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार

English
हिंदी सारांश
Web Title : Akola: Ex-MLA Targeted in Deputy CM Aid Request Scam

Web Summary : Akola's ex-MLA Bajoria was alerted about a fake accident by Deputy CM Shinde, who received a fraudulent call requesting help. Bajoria searched for the accident site but found nothing. The caller then asked for money, confirming it as a scam. Police are investigating the phone number.
टॅग्स :fraudधोकेबाजीEknath Shindeएकनाथ शिंदेGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी