शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील शिक्षक नोंदणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:54 IST

अनेक मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पत्र न दिल्यामुळे या शिक्षकांना मतदार नोंदणीपासून वंचित राहावे लागले.

अकोला: राज्यात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक मतदारांची नोंदणीची मुदत ६ नोव्हेंबरपर्यंत होती. खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील हजारो शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शाळेत तीन वर्ष शिकविल्याचे मुख्याध्यापकांचे पत्र जोडावे लागते; परंतु अनेक मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पत्र न दिल्यामुळे या शिक्षकांना मतदार नोंदणीपासून वंचित राहावे लागले.औरंगाबाद विभाग, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम ६ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आला. २३ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केल्यानंतर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीसाठी एक महिन्याची मुदत दिली होती; परंतु या कालावधीत विधानसभा निवडणूक आणि दिवाळी सुट्ट्यांमुळे शिक्षकांना मतदार नोंदणी करता आली नाही. यासोबतच खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील हजारो शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी शाळेत तीन वर्ष शिकविण्याचे कार्य केल्याचे मुख्याध्यापकांचे पत्र जोडण्याची अट आहे; परंतु मुख्याध्यापक स्वत:च्या जबाबदारीवर शिक्षकांना पत्र द्यायला तयार नसल्यामुळे हजारो शिक्षकांना मतदार नोंदणी वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात २0१३ च्या तुलनेत यंदा शिक्षक मतदारांची नोंदणी कमी झाली आहे. याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक