रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी
By Admin | Updated: June 3, 2014 20:52 IST2014-06-03T19:17:56+5:302014-06-03T20:52:12+5:30
तेल्हारा शहरात काँक्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी
तेल्हारा : शहरात सुरू असलेले घरकुल योजनेंतर्गत श्री शिवाजी मानवता मंदिर ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून गलिच्छ वस्तीतील इतर कामेसुद्धा विनाविलंब करण्याची मागणी स्थानिक जुन्या शहरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.
तेल्हारा नगरपरिषदेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपी विकास योजनेंतर्गत गलिच्छ वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये श्री शिवाजी मानवता मंदिर ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्याचे नगरपरिषदेने ठरविले आहे; परंतु या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. हा रस्ता पाणीपुरवठ्याच्या कामामुळे पाइपलाइन टाकल्याने पूर्ण उखडला आहे. हा जुन्या शहरातील रहदारीचा मुख्य रस्ता असल्यामुळे प्राधान्याने या रस्त्याचे काम सुरू करणे गरजेचे होते; परंतु तसे झालेले नाही. तसेच या घरकुल योजनेंतर्गत जे काही सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामे आहेत. तसेच जी काही इतर कामे आहेत, ती गलिच्छ वस्तीतच नियमानुसार करण्यात यावी, अशी मागणी जुने शहरातील नागरिक श्रीराम सुरे, रामभाऊ सोनटक्के, प्रदीप अनुटकोर, विठ्ठल खाडे, ज्ञानदेवराव खाडे, गोपाल सोनोने, गोपाल गावंडे, रामा फाटकर देवीदास तायडे, गजानन सुरे, गिरीष घोडेस्वार, दीपक टिकार, मंगेश मानकर, विठ्ठल खारोडे, गोपाल मामनकार, गणेश खारोडे, भावेश सायानी, गणेश हागे, जगदीश पाठक, दिनेश कांगटे, नीलेश चव्हाण, पुरुषोत्तम जायले, दिनेश काजळे, गजानन पवार आदी नागरिकांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली. या कामास विलंब लावल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. न. प. अध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच जुने शहरातील नगरसेवक हा रस्ता विनाविलंब सुरू करण्याकरिता काय प्रयत्न करतात, याकडे संपूर्ण शहरावासीयांचे लक्ष लागले आहे.