सोनोरी शिवारात काळविट मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:21 IST2018-11-30T13:21:05+5:302018-11-30T13:21:07+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी - बपोरी येथील शेतकरी प्रल्हाद चुडे यांच्या शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आल्याने घटने संदर्भात तर्क वितर्कांना पेव फुटले आहे.

सोनोरी शिवारात काळविट मृतावस्थेत आढळले
मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी - बपोरी येथील शेतकरी प्रल्हाद चुडे यांच्या शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आल्याने घटने संदर्भात तर्क वितर्कांना पेव फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोनोरी शिवारात प्रल्हाद चुडे यांच्या शेतात रखवालदार शेतात चक्कर लावत असताना काळविट मृतावस्थेत आढळून आले. सदर काळवीटाचा मागीलभाग अज्ञात प्राण्याने अर्धवट अवस्थेत खाल्लेला आढळून आला त्याचप्रमाणे काळवीटाच्या गळ्यावर अज्ञात प्राण्यांच्या दाताचे निशान आढळून आल्याने तर्क वितर्कांना पेव फुटले असल्याने काळवीटाची वाघाने शिकार केल्याची अफवा पसरल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीवर जाण्यास धजत नाहीत.
दरम्यान कुरुम क्षेत्र वनरक्षक पी. डी. हरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.(शहर प्रतिनिधी)