शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे'; काँग्रेसच्या ऑफरला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 21:31 IST

पहिल्या टप्प्यातील निवडणूक रंगात आली असून, पूर्व विदर्भात वंचित’ला पाेषक वातावरण आहे. रामटेकमध्ये शिंदेसेना व किशाेर गजभिये यांच्यात खरी लढत असल्याचे ते म्हणाले.

राजरत्न सिरसाटअकाेला : लाेकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पाेहाेचली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले ‘वंचित’ला साेबत घेण्याचे वक्तव्य करीत आहेत खरं तर याला वरातीमागून घाेडे असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे केली. राज्यातील उर्वरित जागांचा निर्णय दाेन दिवसात जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यशवंत भवन निवासस्थानी आयाेजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर बाेलताना उद्धवसेना व काँग्रेसमधील जागांचा वाद आता रस्त्यापर्यंत आला असल्याचे सांगितले. यासंदर्भात आपण अगाेदरच काँग्रेसला अवगत केले हाेते. पंरतु, राज्यात काँग्रेसला नेताच नसल्याची टीका करताना काँग्रेसला निर्णय घेता आला नसल्याचा आराेपही त्यांनी केला.

यामुळे काँग्रेसचे जिल्हास्तरावरील नेते स्वत:ला असुरक्षित मानत असून, भविष्यातील विधानसभा डाेळ्यासमाेर ठेवून आता ते भाजपचा पराभव कसा करता येईल या दृष्टीने स्थानिक पातळीवर निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील निवडणूक रंगात आली असून, पूर्व विदर्भात वंचित’ला पाेषक वातावरण आहे. रामटेकमध्ये शिंदेसेना व किशाेर गजभिये यांच्यात खरी लढत असल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीच्या मतमाेजणीच्या अगाेदर ईव्हीममधील मतांसाेबतच पेपर ट्रेल मतांच्या माेजणीसाठीचा निर्णय सर्वाेच्च न्यायालय देण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. पत्रकार परिषदेला सुजात आंबेडकरही उपस्थित हाेते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस