मानलेल्या भावाने पळविला चार लाखांचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:01 IST2017-09-04T02:01:12+5:302017-09-04T02:01:39+5:30
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श कॉलनीमधील लीला रेसिडेन्सी येथील एका घरातून मानलेल्या भावाने तीन लाखांच्या रोकडसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविलयाची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी खदान पोलिसांनी सदर महिलेच्या मानलेल्या भावविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मानलेल्या भावाने पळविला चार लाखांचा मुद्देमाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श कॉलनीमधील लीला रेसिडेन्सी येथील एका घरातून मानलेल्या भावाने तीन लाखांच्या रोकडसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविलयाची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी खदान पोलिसांनी सदर महिलेच्या मानलेल्या भावविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आदर्श कॉलनी येथील लीला रेसिडेन्सीमधील रहिवासी शर्मा नामक महिलेच्या घरी त्यांचा मानलेला भाऊ दोन दिवसांपूर्वी आला. बहिणीच्या निवासस्थानी या भावाने मुक्काम ठोकला. त्यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिन्यांची झडती घेतली. घरी कुणीही नसल्याची संधी साधत मानलेल्या भावाने घरातील २ लाख ९0 हजार रुपये रोख आणि १ लाख १0 हजार रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. शर्मा या महिलेचा मानलेला भाऊ रविवारी परत गेल्यानंतर महिलेने रोख आणि दागिने तपासले असता ते चोरी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलेने तातडीने रविवारी रात्री उशिरा खदान पोलीस ठाणे गाठून, या प्रकरणाची तक्रार केली. खदान पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन तपासणी केली, त्यानंतर पंचनामा करून या चोरीचा तपास सुरू केला आहे.