रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:28 IST2018-09-30T12:27:53+5:302018-09-30T12:28:12+5:30

एका ३० वर्षीय अनोळखी युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

 The death of the young man after coming down the railway | रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

अकोला - सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खरब रोड येथील रेल्वे रुळावर एका ३० वर्षीय अनोळखी युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
खरप रोडवरील रेल्वे रूळावर एका 30 ते 32 वर्षे वयोगटातील युवकाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडून असल्याची माहिती सिव्हिल लाईन्स पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर युवकाची ओळख पटली नसून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केले आहे.

Web Title:  The death of the young man after coming down the railway