दहीहांडा (अकोला)- हरभरा काढताना टॅक्टरवरील मळणी यंत्रात सापडल्याने ५० वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या जवळखेड खुर्द येथे ९ फेब्रुवारी रोजी घडली. समाधान इंदोरे असे मृतक मजुराचे नाव आहे.जवळखेड खुर्द येथील डिगांबर जउळकार यांच्या शेतामध्ये मळणी यंत्राने हरभरा काढण्याचे काम शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होते. हरभरा काढण्याचे सुरू असताना मळणीयंत्रावरील मजुर समाधान इंदोरे हे यंत्रामध्ये ओढल्या गेले. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मळणी यंत्रात सापडल्याने मजुराचे तुकडे तुकडे झाले होते. परिसरात कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नसताना मळणीयंत्रावर काम करणे जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी भेट देउन पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
मळणीयंत्रात सापडल्याने मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 17:31 IST