दर्शन नळकांडे दुसऱ्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:16 IST2020-03-14T16:16:48+5:302020-03-14T16:16:53+5:30

ही बाब अकोलेकरांसाठी अभिमानास्पद आहे.

Darshan Nalakande for the second time in the Kings XI Punjab team | दर्शन नळकांडे दुसऱ्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघात

दर्शन नळकांडे दुसऱ्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघात

अकोला: अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेटपटू दर्शन नळकांडे आयपीएल-२०२० करिता सलग दुसऱ्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे. दर्शनने यावर्षी बीसीसीआय अंतर्गत झालेल्या मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत देशातून सर्वाधिक गडी बाद केले आहे. १९ वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया चषककरिता मलेशिया येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले, तर दोन वर्षांपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून अकोला जिल्ह्याचेच नव्हे, तर विदर्भाचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले, ही बाब अकोलेकरांसाठी अभिमानास्पद आहे. उदयोन्मुख क्रिकेटपटूंकरिता दर्शनची कामगिरी प्रेरणादायी आहे, असे क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी सांगितले.

Web Title: Darshan Nalakande for the second time in the Kings XI Punjab team