वाडेगावात वादळी वारा व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:11+5:302021-05-18T04:20:11+5:30

रविवार, १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वाडेगाव तथा परिसरातील तामशी, ...

Damage to crops due to strong winds and unseasonal rains in Wadegaon | वाडेगावात वादळी वारा व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

वाडेगावात वादळी वारा व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

googlenewsNext

रविवार, १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वाडेगाव तथा परिसरातील तामशी, चिंचोली, धाडी, बल्हाडी येथील नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे, तर शेतकऱ्यांच्या लिंबू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. झाडांवर लागलेले लिंबू पूर्णपणे परिपक्व झालेले, तर काही प्रमाणात कच्चे असलेले लिंबू वादळी वाऱ्याने खाली पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे बागेतील लिंबूची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच कांदा, टोमॅटो, भुईमूग व इतर पिकांचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे शेतकरी व नागरिक संकटांचा सामना करीत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे . शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो:

मागील वर्षीपासून कोविडमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाजारपेठ कधी सुरू, तर कधी बंद राहात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतकरी खचून गेला आहे.

- उमेश रमेश पल्हाडे,

शेतकरी

वाडेगाव.

Web Title: Damage to crops due to strong winds and unseasonal rains in Wadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.