शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दलित वस्ती सुधार योजना; अखेर १४ कोटींच्या कामाचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:15 IST

अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेला २०१७-१८ वर्षात दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला.मागील तीन महिन्यांपासून मनुष्यबळाची कमतरता असल्याची लंगडी सबब समोर करीत सर्वेक्षणाला टाळाटाळ केल्याचे समोर आले. विशेष समाजकल्याण विभागाच्यावतीने सोमवारपासून दलित वस्तीमधील कामाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला.

अकोला : समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे महापालिकेला प्राप्त दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १४ कोटींची कामे रखडली होती. या प्रकरणी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.महापालिकेला २०१७-१८ वर्षात दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. दलित वस्तीमधील नवबौद्ध घटकांची दरडोई लोकसंख्या गृहित धरून प्रभागांमध्ये विकास कामे प्रस्तावित केले जातात. नगरसेवकांच्या माध्यमातून विकास कामांच्या यादीला सर्वसाधारण सभेची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. यासंदर्भात सभेने विकास कामांची यादी मंजूर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी सुद्धा दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देऊन यादी सर्वेक्षणासाठी विशेष समाजकल्याण विभागाकडे पाठवली. सदर यादीवर समाजकल्याण विभागाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असताना मागील तीन महिन्यांपासून मनुष्यबळाची कमतरता असल्याची लंगडी सबब समोर करीत सर्वेक्षणाला टाळाटाळ केल्याचे समोर आले. परिणामी १४ कोटींच्या कामांना ग्रहण लागले होते. याविषयी मनपाच्या बांधकाम विभागाने समाजकल्याण विभागाला दोनवेळा स्मरणपत्रही दिले होते. सर्वेक्षणाच्या मुद्यावर होणारी दिरंगाई लक्षात घेता महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आठ दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित विभाग सर्वेक्षणासाठी सरसावल्याचे चित्र समोर आले.दोन दिवसांत सर्व्हेविशेष समाजकल्याण विभागाच्यावतीने सोमवारपासून दलित वस्तीमधील कामाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाची चमू सरसावली असून, दोन्ही यंत्रणांकडून हा सर्व्हे ३ एप्रिलपर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती आहे.नगरसेवकांना दिलासासमाजकल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे १४ कोटींची कामे रखडली होती. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी होती. यासंदर्भात भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी मनपाचा बांधकाम विभाग व समाजकल्याण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. सर्व्हेला सुरुवात होताच नगरसेवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका