शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

बालसंस्कार शिबिरातून संस्कृती संवर्धन व्हावे - बरेठिया

By admin | Updated: May 6, 2014 21:20 IST

श्रद्धासागरात बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन

आकोट : गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराजांच्या पुण्यभूमीत सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे कार्य जाणीवपूर्वक होत आहे. आध्यात्मिक संस्कारासह नीतीमूल्य व उच्चतम विचार बालवयातच रुजविणे काळाची गरज आहे. त्याशिवाय भारतीय संस्कृती टिकणार नाही, हे ओळखूनच गुरुमाउली संत वासुदेव महाराजांनी बालसंस्कार शिबिराची ५० वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली. हा वारसा श्रद्धासागर येथे निष्ठेने जोपासल्या जातो, असे भावोद्गार नगराध्यक्ष बरेठिया यांनी काढले.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा आयोजित बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन आकोटचे नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव हिंगणकर होते. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेवराव महल्ले, गंगाधरजी गोहाड, हभप अंबादास महाराज, ज्ञानेशप्रसाद पाटील, शिबिरप्रमुख मोहन महाराज मेतकर, संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, विश्वस्त दादाराव पुंडेकर, अशोकराव पाचडे, सदाशिवराव पोटे, अनिल कोरपे, जयदीप सोनखासकर आदी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे आयोजित बालसंस्कार शिबिरात वर्‍हाडासह हिंगोली, परभणी जिल्ह्यातील गावोगावचे बालवैष्णव आध्यात्मिक साधनेसाठी श्रीक्षेत्र श्रद्धासागरला दाखल झाले. बालगोपालांच्या उपस्थितीने या पुण्यभूमीला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. शिबिरात सहभागी १५० बालकांना वारकरी परंपरेनुसार माळकरी करण्यात आले. धोतर, टोपी, कपाळी अष्टगंध बुक्का अशी वारकरी वेशातील बालवैष्णव व त्यांची शिस्त, चैतन्य, उत्साहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रारंभी अतिथींचे स्वागत शिबिरप्रमुख हभप मोहन महाराज मेतकर, संभाजी महाराज नवले, सुरेश महाराज लांडे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, गोपाल महाराज जनारे, सतीश महाराज जाणे, सचिन महाराज निचळ, प्रवीण महाराज कुलट, शिवा महाराज, राधेश्याम महाराज ढोले यांनी केले. शिबिराच्या आयोजनाची भूमिका व रूपरेषा हभप वासुदेवराव महल्ले यांनी प्रास्ताविकातून विशद केली. हभप गंगाधरराव गोहाड, हभप ज्ञानेशप्रसाद पाटील यांनी शिबिरार्थ्यांशी हितगूज केले. अध्यक्षीय भाषण पंजाबराव हिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेशराव कराळे, आभारप्रदर्शन डब्ल्यू. राममूर्ती यांनी केले. याप्रसंगी शिबिरार्थी, शिक्षकवृंद, पालक व संस्थेचे आजीवन सदस्य उपस्थित होते.