शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

तब्बल महिनाभरानंतर दुरुस्त झाली ‘सर्वोपचार’ची ‘सीटी स्कॅन’ मशिन!

By atul.jaiswal | Published: August 19, 2018 4:18 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यात रुग्णालय प्रशासनाला जवळपास महिनाभरानंतर यश आले.

ठळक मुद्दे ‘कॅथोड पॉवर मोड्युल’ हा अत्यंत महत्त्वाचा सुटा भाग हॉलंड येथून मागवावा लागला. या सुट्या भागाच्या प्रतीक्षेत सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती रखडली होती. शनिवारी मशीन कार्यान्वित झाल्यानंतर नियमितपणे रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.

अकोला: गत महिनाभरापासून नादुरुस्त असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यात रुग्णालय प्रशासनाला जवळपास महिनाभरानंतर यश आले असून, शनिवारपासून नियमितपणे या मशिनवर तपासण्या करण्यास सुरुवात झाली आहे.सर्वोपचार रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन ‘रोटर बॅलन्स किट’, ‘क्सिट’ स्ट्रॅप पॅड असेम्ब्ली, जनरेटर सर्व्हिस टूल्स व कॅथोड पॉवर मोड्युल हे सुटे भाग निकामी झाल्याने गत २० जुलैपासून बंदच होती. या चार सुट्या भागांपैकी ‘कॅथोड पॉवर मोड्युल’ हा अत्यंत महत्त्वाचा सुटा भाग हॉलंड येथून मागवावा लागला. या सुट्या भागाच्या प्रतीक्षेत सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती रखडली होती. आता या सुट्या भागाची ‘डिलिव्हरी’ मिळाल्यानंतर शुक्रवारी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येऊन त्याच दिवशी सायंकाळपर्यंत ती दुरुस्त झाली. शनिवारी मशीन कार्यान्वित झाल्यानंतर नियमितपणे रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.हॉलंडहून आलेला सुटा भाग प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी मशिन दुरुस्त करण्यात आली. शनिवारी सीटी स्कॅन मशीन रुग्णसेवेत रुजू होऊन नियमितपणे तपासण्या करण्यात आल्या.

- डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय