गुन्हेगारांची टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:29 IST2021-01-05T18:28:56+5:302021-01-05T18:29:37+5:30

Crime News Akola यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून ते सर्व अकोट फैल परिसरातील रहिवासी आहेत.

Criminal gang banished from the district for two years! | गुन्हेगारांची टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

गुन्हेगारांची टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

अकोला: जिल्हांतर्गत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षरक यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून ते सर्व अकोट फैल परिसरातील रहिवासी आहेत.अकोट फैल पोलीस ठाण्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या उस्मानशहा लुकमान शहा (३४), मुस्ताकशहा लियाकत शहा (४२), कयुबशहा करीम शहा (३४), जावेद शहा लतीफशहा (२६), ईस्माईल शहा कादर शहा (३८) यांच्यावर अकोट फैल पोलीस ठाण्यात विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी अकोट फैल पोलीस ठाण्यातंर्गत पुरपीडीत कॉलनी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावरील गुन्ह्यांची मालीका पाहता त्यांच्या विरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाचही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

Web Title: Criminal gang banished from the district for two years!