शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

CovidWarrior : मम्मी, हवं तर मी येते सोबतीला, आपण दोघी कोरोनाला फिनिश करू!

By atul.jaiswal | Updated: May 27, 2020 11:47 IST

हे बोबडे पण तेवढेच खंबीर बोल आहेत आपल्या कोविड योद्धा आईला भेटण्यासाठी गत दीड महिन्यांपासून कासावीस झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचे.

ठळक मुद्देरूपाली पुंड-वाकोडे  वॉर्ड क्र. ८ मध्ये  सेवारत असतात. आपल्या चिमुकलीपासून दूर राहून त्या रुग्णसेवा करत आहेत.सानवी दररोज व्हिडिओ कॉल केल्याशिवाय झोपत नाही.

- अतुल जयस्वालअकोला : ‘मम्मी आता रात्र झाली...पेशंटला गोळ्या देऊन झाले असेल ना...? ते आता झोपले असतील, तू परत ये...! नाही तर मी येऊ का तिकडे तुझ्या सोबतीला ? आपण दोघी मिळून कोरोनाला फिनिश करू...!’ हे बोबडे पण तेवढेच खंबीर बोल आहेत आपल्या कोविड योद्धा आईला भेटण्यासाठी गत दीड महिन्यांपासून कासावीस झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून सेवारत असलेल्या रूपाली पुंड-वाकोडे  वॉर्ड क्र. ८ मध्ये  सेवारत असतात. ‘रोटेशन’ पद्धतीने त्यांना ११ ते २४ मे या काळात कोविड - आयसीयू कक्षात ‘ड्युटी’ देण्यात आली. कोविड वॉर्डात ड्युटी लागणार म्हणून त्यांनी आधीच पूर्वतयारी करून आपली तीन वर्षांची मुलगी सानवी व पती पंकज यांना १५ एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील चिंचोली काळे या मूळ गावी पाठविले. कुटुंबाला संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत त्या तेव्हापासून ‘जीएमसी’ परिसरातील होस्टेलमध्ये राहत आहेत. गत दीड महिन्यांपासून आपल्या चिमुकलीपासून दूर राहून त्या रुग्णसेवा करत आहेत. कोविड वॉर्डात ११ ते २४ मे या कालावधीत रुग्णसेवा केल्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे सात दिवस ‘क्वारंटीन’ व्हावे लागले आहे. कोविड वॉर्डात सेवारत असतानाचा अनुभव विचारला असता, रूपाली पुंड या भावुक होतात. मायलेकीच्या ताटातुटीचे दु:ख त्यांच्या बोलण्यातून जाणवते. केवळ तीन वर्षांची असलेली सानवी दररोज व्हिडिओ कॉल केल्याशिवाय झोपत नाही. ‘आई तू कशी आहेस...? आम्ही कधी येऊ तुझ्याकडे...?’ या सानवीच्या प्रश्नांनी अश्रू अनावर होतात, असे रूपाली पुंड सांगतात.पतीने दिला भावनिक आधार!कोविड वॉर्डात ड्युटी लागल्यानंतर मन थोडे विचलित झाले होते; पण पती पंकज यांनी भावनिक आधार दिला. ‘सानवी, माझी व कुटुंबाची काळजी करू नको, रुग्णसेवा महत्त्वाची आहे. स्वत:ची काळजी घे.’ अशा शब्दात पंकज यांनी आधार दिल्यानंतर मनाची तयारी झाल्याचे रूपाली पुंड यांनी सांगितले.सात दिवस ‘क्वारंटीन’रूपाली पुंड यांची कोविड-आयसीयूमधील ‘ड्युटी’ २४ मे रोजी संपली आहे. तेव्हापासून त्यांना नियमप्रमाणे ‘क्वारंटीन’ व्हावे लागले आहे. सात दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतरही लॉकडाउनमुळे मुलगी व पतीची कधी भेट होईल, हे निश्चित नसल्याचे रूपाली पुंड सांगतात.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या