शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:08 PM

ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे वकिलाने न्यायालयात धाव घेतली होती.

अकोला : खदान पोलीस ठाण्यात मित्राला भेटण्यास गेलेल्या वकिलासोबत गैरव्यवहार करून खिशातून पैसे काढून घेणाऱ्या पोलिसाविरुद्ध एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे वकिलाने न्यायालयात धाव घेतली होती.खदान पोलीस ठाण्यात अ‍ॅड. अमोल क्षीरसागर यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांचे मित्र प्रशांत पडघन यांचा कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. ठाण्यात मित्राला भेटण्यासाठी गेल्यानंतर विजय शेगोकार नामक कर्मचाºयाने त्यांना थांबवून असभ्य भाषेत व्यवहार केला, याचवेळी तेथे आकाश मानकर व इतर कर्मचाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ करीत सरकारी कामांत अडथळा आणण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सोबतच मारहाण करून खिशातून पाचशे रुपये व मोबाइल काढून घेतला.त्यानंतर अ‍ॅड. अमोल क्षीरसागर यांनी कलम १५६/३ च्या २९४, ३२३, ३४१, ३९२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करून न्यायालयात वैयक्तिक याचिका दाखल केली. या याचिकेवर तृतीय प्रथम श्रेणी न्यायाधीश के. पी. दवणे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी आरोपी पोलीस कर्मचाºयांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय